उपक्रम

अध्यक्ष

कुठले हि कार्य म्हणाले तर त्या सुरवातीस किंवा त्या शुभारंभाला कुठलीतरी प्रेरणा आवश्यक असते. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्टानच्या स्थापनेला लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब (कृषिमंत्री, भारत सरकार ) यांची राजकीय , सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडाविषयक कार्य्कीर्द प्रेरानादाई ठरलेली आहे. प्रतिष्टानची दुसरी प्रेरणा परंपरेने घरातूनच मिळाली. ज्या समाजात आपण राहतो त्यचे थोडे ऋण फेडणे आपले कर्तव्य आहे. या भावनेने माझे आजोबा स्व. सुखलाल खाबिया , वडील मोहनलाल खाबिया, चुलते स्व. जुगराज खाबिया यांनी कार्य केले. त्याला आई स्व. रत्नप्रभा खाबिया व मामा श्रीपाल मुठा यांचा पाठींबा होता. प्रतिष्टान स्थापन करताना क्रीडा व सांस्कृतिक या दोन गोष्टीवर आधारित कार्यक्रम घेण्याचे व विविध उपक्रम राबविण्याचे निश्चित केले होते.